Best News Portal Development Company In India

उद्योग विभागाच्या संघटन बळकटीसाठी अभिजीत आपटे यांचा डोंबिवली दौरा!

उद्योग विभागाच्या संघटन बळकटीसाठी अभिजीत आपटे यांचा डोंबिवली दौरा

डोंबिवली, दि. 21 जून 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या मुंबई विभाग कार्यालयास महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अभिजीत आपटे यांनी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. डोंबिवली येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, उद्योग क्षेत्रातील प्रश्न तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योग विभाग मुंबई विभाग अध्यक्ष श्री. अश्विन हेमंतकुमार केळकर, मुंबई विभाग उपाध्यक्ष डॉ. उदयराज सिताराम तळेकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक जाधव, पश्चिम मुंबई अध्यक्ष श्री. सुजित गुप्ता, मध्य मुंबई अध्यक्ष श्री. संदीप उबाळे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. शाम नाना चौगले, ठाणे शहर सचिव श्री. सचिन फुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मराठे तसेच कल्याण-डोंबिवली अध्यक्ष श्री. वेंकटेश नायडू उपस्थित होते.

श्री. अभिजीत आपटे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेने अधिक सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करून उद्योग विभागाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

बैठकीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विभागाच्या आगामी उपक्रमांबाबत आपली मते मांडली. या भेटीमुळे उद्योग विभागाच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी श्री. अभिजीत आपटे यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india