Best News Portal Development Company In India

धाराशिव पोलिसांची थरारक कामगिरी: कळंबमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाडसी छापा, ५९ जणांवर गुन्हा दाखल करत २० लाखांचा मुद्देमाल जप्त!

धाराशिव पोलिसांची थरारक कामगिरी: कळंबमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाडसी छापा, ५९ जणांवर गुन्हा दाखल करत २० लाखांचा मुद्देमाल जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव ​जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची आजवरची सर्वात मोठी कारवाई पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या पथकाचा मध्यरात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’
​धाराशिव: जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परिभावी पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या विशेष पथकाने कळंब परिसरातील एका भव्य जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाडसी छापा टाकला. या कारवाईत क्लब संचालकांसह तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी १९ लाख ९६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
​सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली ‘तीन पत्ती’चा बाजार मांडणाऱ्यांची झाली बोलती बंद!
​कळंब-ढोकी रोडवरील (हॉटेल हिमालय बार शेजारी) ‘संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ येथे क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर केला जात होता. सर्व नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी अत्यंत पद्धतशीरपणे आणि हायप्रोफाईल पद्धतीने ‘तीन पत्ती’ (तिरट) नावाचा जुगार चालवला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळाली होती.
​पोलीस उपअधीक्षकांचे थेट नेतृत्व अन् अचूक रणनीती आणि करेक्ट टाइमिंग चा फायदा.
​माहिती मिळताच कोणतीही कुणकुण लागू न देता पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी स्वतः अत्यंत गुप्तपणे सापळा रचून या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या विशेष पथकाने रात्रीच्या वेळी अचानक या मंडळावर छापा टाकला. पोलिसांचा हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ इतका वेगवान होता की जुगार बहादरांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही आणि संपूर्ण अड्डा जागच्या जागी उद्ध्वस्त करण्यात आला. ​५४ जण रंगेहात ताब्यात, २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार अड्ड्यावर एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून पोलिसांनी ५४ जुगारी बहादरांना रंगेहात ताब्यात घेतले. जुगार खेळणारे आणि क्लबचे ५ संचालक अशा एकूण ५९ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ आणि ५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह खालील मुद्देमाल जप्त केला ​मोठी रोख रक्कम ,​महागडे मोबाईल फोन्स, ​चारचाकी आणि दुचाकी वाहने, ​एकूण किंमत १९,९६,०५०/-
​कारवाईत सहभागी झालेले ‘जाँबाज’ पथक
​पोलीस उपअधीक्षकांच्या थेट नेतृत्वाखालील या यशस्वी आणि धाडसी कामगिरीत खालील अधिकाऱ्यांनी व पथकाने मोलाची भूमिका बजावली-
​श्री. प्रवीण सोमवंशी (सहायक पोलीस निरीक्षक)
​श्री. सुरेश कासुळे (सहायक पोलीस निरीक्षक)
​श्री. रामचंद्र बहुरे (पोलीस उपनिरीक्षक)
​आरसीपी (RCP) आणि क्यूआरटी (QRT) या विशेष पथकांचे अंमलदार व चालक.
​”जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका, हातभट्टी व अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाकडून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही गोपनीय व प्रभावी कारवाया सुरूच राहणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईने धाराशिव जिल्ह्यात अवैद्य करणाऱ्यांना पोलिसांचा दबदबा दिसून आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india