Best News Portal Development Company In India

पीएमश्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

पीएमश्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याला अभिवादन करत त्यांच्या शिक्षणविषयक धोरणांचा, सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याचा तसेच वंचित, दुर्बल आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अजीज शेख, मुख्याध्यापक बालाजी भोसले, सहशिक्षक सुनील राठोड, विशेष शिक्षक सहदेव बोडरे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असा संदेश देण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india