नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मोफत नेत्रतपासणी व सवलतीच्या दरात चष्मा वाटप!
मुंबई, दि. २६ जून २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) व अष्टविनायक हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी आणि ५० टक्के सवलतीत चष्मा वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून शेकडो नागरिकांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या लाभार्थ्यांना अल्प दरात व ५० टक्के सवलतीत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवेचा लाभ मिळाला.
या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन केळकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक जाधव, मुंबई विभाग उपाध्यक्ष उदयराज सिताराम तळेकर, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, पश्चिम मुंबई अध्यक्ष सुजित गुप्ता, कार्यालय प्रमुख रवींद्र शिंदे तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अश्विन केळकर यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय असून, भविष्यातही अशा विविध आरोग्यविषयक जनकल्याणकारी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल.”
उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.







