Best News Portal Development Company In India

तुरोरी येथील प्रताप तपसाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड.

तुरोरी येथील प्रताप तपसाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील तुरोरी येथील प्रताप व्यंकटराव तपसाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड करण्यात आली असून सदरील निवड हि जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह वेदप्रकाश पाटिल यांच्या स्वक्षरीनीशी पत्र देवुन केली आहे.
दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षासाठी आजतागायत दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेऊन आपली जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड करण्यात येत आहे,पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा ध्येय धोरण सर्वस्तरावर पोंहंचविण्यासाठी, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व स्तरावर अधिकाधिक व्यापकपणे पोहंचवुन कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहुन पक्ष मजबुती करण्यात यावी असे नियुक्ती पत्रात कळविले असुन प्रतापराव तपसाळे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india