Best News Portal Development Company In India

त्रिकोळी येथे मुख्याध्यापिका व सहशिक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात!

त्रिकोळी येथे मुख्याध्यापिका व सहशिक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात
——
उमरगा शहर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिकोळी येथे मुख्याध्यापिका श्रीमती वंदना बापुराव बिराजदार व सहशिक्षक श्री विलास आत्माराम जाधव यांच्या नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमास कुन्हाळी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या लताताई शिवाजीराव दाजी मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दोन्ही शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षक हे समाज घडविणारे शिल्पकार आहेत. अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही शिक्षकांची सेवा प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा असे गौरवोद्गार काढले. सेवानिवृत्त होत असलेल्या दोन्ही शिक्षकांनी आपल्या दीर्घ शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार आणि शिस्तीची मूल्ये रुजविण्यासाठी केलेल्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. त्यांच्या कार्याची आठवण सांगताना अनेकांचे मन भरून आले.
कार्यक्रमाला गावातील मान्यवर, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही शिक्षकांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india