उमरगा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन.
प्रतिनिध दमयंती भालेराव.
ॲड.शीतल चव्हाण फाऊंडेशन, उमरगा आणि प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा शाखेत लोकराजा तथा आरक्षणाचे जनक *छत्रपती राजर्षी शाहू महाराज* यांची जयंती साजरा करण्यात आली. दरम्यान छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तालुक्यातील तुरोरी येथे श्री.ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक शाळेचे वरिष्ठ व विध्यार्थी प्रिय शिक्षक सन्माननीय शिवाजी विठ्ठलराव जाधव सर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव,प्रा.युसूफ मुल्ला सर,ॲड.ख्वाजा शेख,ॲड.फिरोज मुल्ला,महिला विंगचे अध्यक्ष ॲड.अर्चनाताई जाधव,उपाध्यक्ष शबाना उडचणे,ज्योतीताई माने,प्रदीप चौधरी,करीमभाई शेख,बबिता मदने,किशोर बसगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान अध्यक्षीय समारोप करताना ॲड.शीतल फाउंडेशन यांना वाचनीय पुस्तके घेण्यासाठी रुपये अकराशे देणगी दिली व यापुढे फाउंडेशनच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमात तन मन धनाने सहकार्य राहील असे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी त्यांना निमंत्रण दिल्याबद्दल ॲड.शीतल चव्हाण फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. दरम्यान ॲड.अर्चनाताई जाधव, प्रदीप चौधरी यांची छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड.ख्वाजा शेख यांनी केले व शेवटी उपस्थिणांचे आभार फाउंडेशन अध्यक्ष सत्यनारायण जाधव यांनी मानले.






