Best News Portal Development Company In India

भक्तीचा सुवर्णयोग! पुण्याच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी मातेला तब्बल ४९ ग्रॅमचा सोन्याचा हार अर्पण!

भक्तीचा सुवर्णयोग! पुण्याच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी मातेला तब्बल ४९ ग्रॅमचा सोन्याचा हार अर्पण!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगत जननी श्री तुळजाभवानीच्या चरणी भक्तीचा सुवर्णयोग . साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मुख्य पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविक नेहमीच आपली अथांग श्रद्धा अर्पण करत असतात. नुकतीच पुणे जिल्ह्यातील एका भाग्यवान भाविकाने कुलस्वामिनीच्या चरणी मोलाचा सुवर्ण नजराणा अर्पण करून आपली मनःपूर्वक भक्ती व्यक्त केली आहे.
​पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी श्री. सचिन कालूराम येणभर यांनी श्री आई तुळजाभवानी मातेला ४९.४२० ग्रॅम वजनाचा एक अत्यंत आकर्षक आणि कलाकुसर केलेला सुवर्ण हार अर्पण केला.
​सहकुटुंब घेतले दर्शन, मंदिरात विधिवत सोहळा
​मिळालेल्या माहितीनुसार, श्री. येणभार हे आपल्या सहकुटुंबासह श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. मुख्य गाभाऱ्यात आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे हा सोन्याचा हार विधिवत सुपूर्द केला. मंदिर संस्थानच्या अधिकृत दप्तरी या सुवर्ण हाराची रीतसर नोंद करण्यात आली आहे.
​आई भवानीच्या चरणी दाखवलेल्या या अनन्य साधारण श्रद्धेबद्दल मंदिर संस्थानच्या वतीने श्री. येणभार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. या मंगलप्रसंगी मंदिर संस्थानचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच मंदिराचे पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री येणभर कुटुंबाकडून दाखवलेल्या दातृत्वाबद्दल तुळजापुरातील नागरिकांतून स्वागत होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india