Best News Portal Development Company In India

धक्कादायक! अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल!

धक्कादायक! अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महिलेचे अश्लील चित्रण करुन धमकी देऊन आत्याचार .अंघोळ करतानाचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेचा छळ एवढ्यावरच थांबला नाही, तर तिने पोलिसांत जाण्याची चेतावणी दिली असता संशयित आरोपीने तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
​या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ मार्च २०२६ रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिला आरोपीच्या धमकीला बळी पडली. आरोपी तरुणाने “तुझे अंघोळ करतानाचे छायचित्रीकरण (व्हिडिओ) माझ्याकडे आहे, ते व्हायरल करीन” अशी भीती पीडितेच्या मनात भिती निर्माण केली. त्यानंतर तिला बळजबरीने शेतातील उसाच्या पिकात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.​पोलीसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी.
​या प्रकारानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवत आरोपीला “मला फोन करू नकोस, मी तुझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेन” असे बजावले. याचा राग येऊन संबंधित तरुणाने पीडितेचा मानसिक छळ केला, तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि पोलिसांत गेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
​या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना न जुमानता पीडित महिलेने शेवटी २६ जून २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पीडितेच्या प्रथम खबरीवरून (FIR) ढोकी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:
​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४ (बलात्कार), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी)
​अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (Atrocities Act): कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हि)
​या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. कायदा आणि पीडितेच्या गोपनीयतेचे भान ठेवून पोलीस प्रशासनाने तिची ओळख सुरक्षित ठेवली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india