गुणवत्ता असेल तर यश नक्की मिळते – खा.ज्योती वाघमारे ज्ञानज्योती पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
ज्ञानज्योती फाऊंडेशन, उमरगा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.28 फेब्रुवारी 2029 रोजी शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात उमरगा व लोहारा तालुक्यातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ज्ञानज्योती पुरस्कार वितरण करण्यात आले. याचबरोबर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी परिस्थितीला दोष न देता अभ्यास करत राहिल्यास त्यांच्याकडे गुणवत्ता असल्यास यश नक्की मिळते.
डॉ.विजयकुमार फड सर यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.आकांक्षा चौगुले, अध्यक्षीय समारोप माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड सर यांनी केले.
दीपप्रज्वलन माजी आमदार शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ शिवसेना नेते जितेंद्र दादा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवा लोहारा पं.स. सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, गटशिक्षणधिकारी उमरगा अमोल राजपुत, गटशिक्षणाधिकारी लोहारा शिवकुमार बिराजदार, आदी मान्यवर हे उपस्थित होते.
मा.सुनील माने, बेडगा ता.उमरगा, मा.प्रवीणचंद्र तोतला, रा.उमरगा ता.उमरगा
मा.शेखर घंटे, रा.नारंगवाडी ता.उमरगा
मा.रसिका कटकधोंड, रा.केसरजवळगा ता.उमरगा
मा.गिरीष भगत रा.लोहारा ता.लोहारा
मा.संतोष शिंदे , रा.मुळज ता.उमरगा
यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पवार, संदीप जगताप यांनी व आभार प्रदर्शन विजय वडदरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, कोषाध्यक्ष अमर देशटवार यांनी प्रयत्न केले.
यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील गुणव विद्यार्थी, पालक
व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









