मंदिरात परिसरात सापडलेला ७५ हजारांचा आयफोन पोलिसांच्या सतर्कतेमुळे मूळ मालकाला हस्तगत!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर परीसरात हरलेला मोबाईल मुळ मालकाला परत करण्यात आला. दिनांक- २९ जून २०२६ काल दि. २८ जून २०२६ रोजी मंदिर परिसरात घडलेल्या एका घटनेत, पोलिसांची तत्परता आणि एका नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे एका पोलीस कॉन्स्टेबलचा हरवलेला महागडा मोबाईल त्यांना सुखरूप परत मिळाला आहे.
CCTV आणि लोकेशन ठरले उपयुक्त
पोलीस कॉन्स्टेबल तेलप यांचा ७५,००० रुपये किमतीचा आयफोन (iPhone) काल मंदिर परिसरात अचानक हरवला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच तातडीने तपास चक्रावून मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले आणि मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले. या तांत्रिक तपासादरम्यान सदर मोबाईल ‘प्रकाश क्षीरसागर’ नावाच्या व्यक्तीला सापडल्याचे स्पष्ट झाले.
लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तातडीने प्रकाश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला. क्षीरसागर यांनीही कसलाही विलंब न लावता, अत्यंत प्रामाणिकपणे तो महागडा आयफोन स्वतः पोलीस ठाण्यात आणून हजर केला.
”आजच्या काळात तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकाच नागरिकांचा प्रामाणिकपणाही मोलाचा आहे. प्रकाश क्षीरसागर यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.”
यानंतर पोलीस ठाण्यात एक छोटेखानी कार्यक्रम करून, पोलीस निरीक्षक मांजरे साहेब यांच्या हस्ते तो मोबाईल मूळ मालक पोलीस कॉन्स्टेबल तेलप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेचे आणि प्रकाश क्षीरसागर यांच्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.






