ज्ञानज्योती संस्थेतर्फे प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने मुरूमच्या प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मधील दहावीच्या बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी (दि. २८) रोजी सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शाळेचा नावलौकिक उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक करण्यात आले. चंद्रशेखर तावडे (प्रथम क्रमांक) व कुमारी समृद्धी खददे (द्वितीय क्रमांक) यांचा पालक, मार्गदर्शक सहशिक्षक जगदीश सुरवसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी डॉ. विजयकुमार फड, खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड सर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, उमरगा चे नगराध्यक्ष किरण गायकवाड, ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲड. आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, शिवकुमार बिराजदार, बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच, या यशाच्या मागे असलेल्या शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि पालकांचे अथक परिश्रम यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मिळाली.
मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी मान्यवर व विद्यार्थी, शिक्षक.






