Best News Portal Development Company In India

बसव प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळेत २२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

बसव प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळेत २२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२६ चे औचित्य साधून मुरूम येथील जिल्हा परिषद प्रशालेत ५ वी ते ८ वीच्या १७० व केंद्रीय प्राथमिक शाळेतील ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे समाजसेवक तथा अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक विजयकुमार देशमाने, विलास कंटेकुरे,केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्यध्यापक अशोक बोईनवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. पुराणे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात माघे राहू नये, आपला परिसर कृषी प्रधान परिसर असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा गरजू विद्यार्थी असतो तसेच समाजाने जी देणगी आम्हाला दिली ती देणगी समाजापर्यंत प्रामाणिक पोहचवणाची जबाबदारी ही सामाजिक संघटनेची असते आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा पारदर्शक प्रयत्न करत असून शालेय साहित्यविना विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी शिवाजी कवाळे,संतोष कडगंचे,हरिभाऊ माकणे,गणपत पाटील,मोहन राठोड,श्रीमती बिना पोद्दार,श्रीमती संगीता डोकडे,श्रीमती सुनंदा हुल्ले, श्रीमती अल्कादेवी गायकवाड,राजू पवार,नागनाथ कामशेट्टी आदीसह पालक उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india