Best News Portal Development Company In India

कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट.

कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मुरूम सिटीच्या वतीने कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास ‘स्मार्ट टीव्ही’ भेट देण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी ( ता. ३०) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील होते. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, नूतन अध्यक्ष कलय्या स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश रोडगे, मुख्याध्यापक इरफान मुजावर, पालक मल्लिनाथ बिराजदार, हनुमंत आपचे, बिभीषण कांबळे, पोर्णिमा कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या समर्थ बिराजदार, समीक्षा कांबळे, प्राजक्ता स्वामी, अस्मिता आलेगावे, प्रज्ञा कांबळे, गणेश जमादार, मल्लिकार्जुन बिराजदार, रितेश कांबळे, भाग्येश कट्टेपुरे, ओमकार पाटील, समर्थ बेळवडे, शिवानंद स्वामी, लक्ष्मण बंदीछोडे, इब्राहिम मकानदार, अमिना शेख या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या मनोगतात डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवण्यासाठी या स्मार्ट टीव्हीचा मोठा फायदा होईल. यावेळी गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा आढावा घेत या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इरफान मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोनकटले यांनी केले तर आभार रवींद्र सुरवसे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गुरव, नंदू आपचे आणि रवी गावडे यांनी विशेष पुढाकार घेतला.
फोटो ओळ : कोथळी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने स्मार्ट टीव्ही व शालेय साहित्य वाटप करताना मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india