रामटेक बंगला मुंबई येथे धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेचे
नवनिर्वाचित आमदार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी घेतली पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि.३० रोजी धाराशिव, लातूर, बिड विधानपरीषदेचे नवनिर्वाचीत अमदार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मुंबई येथील रामटेक निवासस्थानी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीतील सहकार्याबद्दल माननीय पंकजाताईंचे आभार व्यक्त केले.
तसेच रामटेक बंगला मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकरावजी चव्हाण यांचीही सदिच्छा भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीतील सहकार्याबद्दल माननीय चव्हाण यांचे ही आभार व्यक्त केले .
दोघांनीही विधानपरिषदेचे आमदार माजी मंत्री बसवराज पाटील यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी उमरगा जनता बँकेचे चेअरमण शरण पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे आदिंची उपस्थिती होती.







