वैमानिका पेक्षा ही एसटी.चालकाचे काम जोखमीचे असून कौतुकास्पद आहे : प्रा.एम. एम. मस्के
——————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
वैमानिकांना आपले विमान एका निश्चित दिशेने घेऊन जावे लागते परंतु एसटी बस चालकांना मात्र घाटातील चढ-उतार आणि नागमोडी वळणाचा रस्ता पार करत शहरातील गर्दीतून मार्ग काढत रस्त्यावरून आपल्या निश्चित ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाण्याचे अत्यंत जोखमीचं काम करावे लागत असून ते कौतुकास्पद आहे.तब्बल ३२ वर्षे एस.टी. बस चालक म्हणून विनाअपघात सेवा करून सातलिंग मस्के यांनी सेवानिवृत्ती घेतली त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत तथा दयानंद महाविद्यालयात सोलापूर येथून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ प्राध्यापक एम.एम.मस्के यांनी तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगार येथून एसटी बस चालक म्हणून तब्बल ३२ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले होणाळा तालुका तुळजापूर येथील
सातलिंग बलभिम मस्के यांच्या सेवापुर्ती बद्दल परिवहन महामंडळतील कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना प्राध्यापक एम.एम.मस्के बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सेवेवर प्रवाशांचा भरवसा असून “एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास” अशी विश्वासार्था एसटी बसने जनमानसात निर्माण केली आहे ती केवळ अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यामुळेच.त्यामुळे आजही लाल परीने सामान्य माणसाच्या हृदयात आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूरचे आगार प्रमुख महेश रामपुरे हे होते तर प्रमुख पाहुणे लेखाधिकारी सूधिर बामनकर, माझी विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी संजय कदम आदी होते.या प्रसंगी सातलिंग मस्के यांच्या सेवानिवृत्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार पुष्पगुछ शाल,फेटा,स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम रणदिवे यांनी केले यावेळी प्रा.डी.डी.मस्के, सहशिक्षक सुनील लोंढे,रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, भिमशाहीर भिमराव सोनवने, विपूल सुरवसे,महामंडळाचे कर्मचारी जे.बी. सिरसट, सोमनाथ कस्तुरे,शहाजी डावरे, नेताजी मुळे, विलास सरवदे सह कर्मचारी हितचिंतक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








