Best News Portal Development Company In India

शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करावी – प्रा. सुरेश बिराजदार!

शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करावी – प्रा. सुरेश बिराजदार!

प्राचार्य जे.एन.जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार .

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील बलसूर येथील श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जे.एन.जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मंगळवारी (दि.३०) रोजी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष माणिकराव बिराजदार होते .यावेळी सचिव प्रा.सुरेश बिराजदार,उपाध्यक्ष गोंविदराव सांळुके, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सहसचिव अशोकराव मोरे, संचालक माधवराव पाटील, मारुती अंबेकर, लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील सांळुके, सेवानिवृत्त प्राचार्य जी.एस.देवणे, बळीराम नांगरे , मुख्याध्यापक सतीश वाकडे, विकास गोरे, बालाजी अंबेकर आदींची उपस्थिती होती. श्नी.जाधव यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा.बिराजदार म्हणाले की, समाज सुधारणेच्या कार्यात शिक्षकाचे योगदान मोठे असून शिक्षकांनी सेवानिवृतीनंतर सामाजिक कार्य हाती घेऊण समाज सेवा करावी. एस.टी.गायकवाड, सुनील सांळुके,जाधव यांचेही भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार अविनाश सुरवसे मांडले. प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india