Best News Portal Development Company In India

काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी ऍड.अरविंद बेडगे यांची निवड!

काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी
ऍड.अरविंद बेडगे यांची निवड!
—————————————————— …
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड):
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग चे प्रसिद्ध वकील अँड.अरविंद आप्पाराव बेडगे यांची निवड करण्यात आली आहे.
अँड.अरविंद बेडगे यांनी अनेक वर्षापासून समाजिक व राजकीय चळवळीच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी नगरपरिषद नळदुर्ग येथे दोन वेळा काँग्रेस पक्षाचे तर्फे निवडणूक लढविले आहेत. आजही त्यांची पत्नी अर्पणा अरविंद बेडगे हे नळदुर्ग नगरपरिषद च्या नगरसेविका आहेत. एकूणच ऍड.अरविंद बेडगे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष संघटित व मजबूत करण्याच्या हेतूने त्यांची ही सार्थ निवड करण्यात आली असल्याची चर्चा कार्यकर्त्या मध्ये होताना दिसते.
त्यांच्या या सार्थ निवडी बदल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत माळगे, मंदार पुदाले,सागर कलशेट्टी,सागर स्वामी,ओंकार स्वामी,अभिजीत पाटील, अनिल कलशेट्टी,अमित पाटील, साजिद काजी, विवेक बेडगे, विशाल डुकरे,शिवया स्वामी, अंबादास पवार,नागणे साहेब सह कार्यकर्त्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india