Best News Portal Development Company In India

उमरगा येथे अ,ब,क,ड, अनुसूचित जातीच्या उपवर्गिकरण रद्द करा या मगणीसाठी शासनाच्या विरोधात ५९ जाती एकत्रितपणे येवून केले भव्य दिव्य अंदोलन.

उमरगा येथे अ,ब,क,ड, अनुसूचित जातीच्या उपवर्गिकरण रद्द करा या मगणीसाठी शासनाच्या विरोधात ५९ जाती एकत्रितपणे येवून केले भव्य दिव्य अंदोलन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली ५९ जातींची वज्रमुठ तोडण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप करत या निर्णयाविरोधात उमरगा तालुक्यात ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने शुक्रवार, दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उमरगा येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा स्मारक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हलगीच्या निनादात भव्य रँली काढण्यात आली होती.
या संदर्भात कृती समितीने उमरगा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी जनता हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होवुन “एका जातीचा अपवाद वगळता कोणीही या उपवर्गीकरणाचे समर्थन करत नाही. मागासवर्गीय समूहात फूट पाडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे,” असे आवाहन मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आले.
अंदोलनातील प्रमुख मागण्या.
——————————————
बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भातील बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जनतेसाठी खुला करावा, जेणेकरून नागरिकांना त्यावर आपल्या सुचना आणि आक्षेप नोंदवता येतील.उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवा,सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपवर्गीकरण करणे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी.कंत्राटी नोकर भरती बंद करा,शासकीय सेवेतील कंत्राटी पद्धतीची नोकर भरती तात्काळ बंद करून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष तात्काळ भरावा व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी.
नो एंट्री’ प्रक्रिया रद्द करा, राखीव प्रवर्गातील सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’ देण्याची अन्यायकारक प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी.अत्याचार थांबवा,राज्यातील मागासवर्गीयांवर वाढत असलेले अन्याय आणि अत्याचार त्वरित थांबवण्यात यावेत अशा प्रमुख पाच मागण्या सह विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.
दरम्यान डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य मोर्चाचे रुपांतर सभेत झाले संविधान व सामाजिक न्यासाठी राजकीय जोडे बाजुला सारुन न्याय हक्कासाठी एकत्रीत येवुन डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या ऐक्याला तडा जावु देणार नाही.
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द खपवून घेतले जणार नाही असा खडा सवाल क्रती समितीच्या पदाधिकारी यांनी यावेळी भाषणातून भावणा व्यक्त करण्यात आल्या.
महामोर्चा यशस्वी करण्यासाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, उमरगा तालुकाचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते मा.आ. ज्ञानराज चौगुले,
पंचायत समिती सभापती अँड. अकांक्षा चौगुले, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती हरिश डावरे, पंचायत समिती सदस्य कैलास शिंदे, जेष्ठ नेते एस.के. चेले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, भा.ज .पा.मागासवर्गीय सेलचे दिलीप भालेराव, भारिप बहुजन महासंघाचे नेते रामभाऊ गायकवाड , अँड शितल चव्हाण, अँड मल्हारी बनसोडे, अँड हीराजी पांढरे,संभाजी ब्रिगेचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, कीसन दामावले, धिरज बेळंबकर, दत्ता रोंगे,नगरसेवक बाबा मस्के,माजी नगरसेवक सतिष सुरवसे,विक्रम मस्के,आनंद कांबळे, लखन बोंडवे, सचिन माने उमेश सुरवसे,संदिप चौगुले, अदिसह क्रती समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, संविधान प्रेमी ,अंबेडकर अनुयायी, युवक युवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंदोलन स्थळी तहसीलदार गोविंद येरमे यांनी अंदोलकाचे मागण्याचे निवेद स्विकारुन उच्यय स्तरावरील कार्यवाहीसाठी पोंहंचविण्यात येईल असे अश्वासन यावेळी अंदोलकाना देण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दरम्यान अनुचित प्रकार घडु या नये करीता पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
अंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटना पदाधिकारी, संविधानात प्रेमी उपस्थित अंबेडकर अनुयायांचे धिरज बेळंबकर यांनी अभार व्यक्त केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india