Best News Portal Development Company In India

धक्कादायक: मुलाची बनावट आई बनून चोरली शाळेतील कागदपत्रे; उमरगा न्यायालयाच्या आदेशानंतर महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल!

धक्कादायक: मुलाची बनावट आई बनून चोरली शाळेतील कागदपत्रे; उमरगा न्यायालयाच्या आदेशानंतर महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यात फसवणुकीचा प्रकार उघड बनवत आहे म्हणून मुलाच्या शैक्षणिक कागदपत्रांची पळवा पळवी उघड न्यायालयाने दणका देताच गुन्हादाखल. शाळेत जाऊन स्वतःला एका मुलाची खरी आई असल्याचा खोटा बनाव रचत, त्याची अत्यंत महत्त्वाची आणि मौल्यवान शालेय मूळ कागदपत्रे फसवणूक करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उमरगा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आरोपी महिलेसह तिच्या साथीदारांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिराजी तुळशिराम गायकवाड (वय ५२ वर्षे, रा. दापका, ता. उमरगा, जि. धाराशिव) हे आपल्या पत्नीपासून विभक्त राहतात. याचाच गैरफायदा घेत आरोपी महिला श्रध्दा उर्फ गौरी धैर्यशील पाटील (जगताप) (वय २५ वर्षे, रा. भांतागळी, ता. लोहारा) हिने फिर्यादीच्या विभक्त राहणाऱ्या पत्नीशी आणि तिच्या नातेवाईकांशी संगनमत केले.
​फिर्यादीला धाक-धपटशही दाखवून, भीती घालून त्यांच्याकडून पैसे आणि मालमत्ता उकळण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण कट रचण्यात आला होता.
​दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते संध्याकाळी १७:०० वाजेच्या सुमारास, आरोपी महिला श्रध्दा पाटील ही उमरगा येथील ‘डॉ. के. डी. शेंडगे सी.बी.एस.ई. स्कूल’ येथे गेली. फिर्यादीच्या मुलाची ती खरी आई नसतानाही, तिने शाळा प्रशासनाला “मीच या मुलाची आई आहे” असे खोटे सांगितले. शाळा प्रशासनाची दिशाभूल करून तिने मुलाची अत्यंत महत्त्वाची मूळ शालेय कागदपत्रे फसवणूक करून ताब्यात घेतली आणि तिथून निघून गेली.
​हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर, फिर्यादी हिराजी गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. माननीय न्यायालय क्र. १ उमरगा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कलम १५६(३) सीआरपीसी (CrPC) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले.
​न्यायालयाच्या या आदेशावरून दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवण्यात आला आहे.
​’या’ गंभीर कलमान्वये गुन्ह्याची नोंद
​उमरगा पोलिसांनी आरोपी श्रध्दा उर्फ गौरी धैर्यशील पाटील व तिच्या साथीदारांविरुद्ध भारतीय दंड विधान (IPC) च्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:
​कलम ४१९, ४२०: तोतयागिरी आणि फसवणूक करणे.
​कलम ३८३: जबरदस्तीने पैसे किंवा मालमत्ता उकळणे (खंडणी).
​कलम ४६३, ४६४, ४६८: बनावट दस्तऐवज तयार करणे आणि फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी करणे.
​कलम १२०(बी), ३४: संगनमत करून कट रचणे आणि सामूहिक उद्देशाने गुन्हा करणे.
​सदरील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत असून, या कटामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india