Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात दि.२७जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे : या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी दि.९.जुलै रोजी धाराशिव येथे बैठकीचे आयोजन.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात दि.२७जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे : या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी दि.९.जुलै रोजी धाराशिव येथे बैठकीचे आयोजन.
———————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती धाराशिव च्या वतीने दिनांक २७ जुलै २o२६ रोजी धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार असून यासंदर्भात दि.६ जुलै २o२६ रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दि.९ जुलै २o२६ रोजी या संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांची एक व्यापक बैठक घेण्याचे ही यावेळी ठरले आहे.अनुसूचित जाती अरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण करण्याचे जाणीवपूर्वक षडयंत्र रचले गेले असून एका विशिष्ट घटकाला पुढे करून जाती-जातीत भांडण लावण्याचा हा मनुवादी विचारसरणीचा डाव हाणून पाण्यासाठी सर्वानी एकत्र येणे ही काळची गरज आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या ५९ जातींना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समान संधी समान हक्क दिलेले असून व या आरक्षणाचा सर्व घटकातील लोकांना कमी अधिक प्रमाणात लाभ होत असताना देखिल ठराविक एका वर्गाने आरक्षण लाटले असा खोटा व खोडसाळवाणा अपप्रचार करून अनुसूचित जातीचे लोकसंख्येनुसार अ ब क ड असे उपवर्गीकरण करण्याचे षडयंत्र रचून एकसंघ असलेल्या अनुसूचित जाती घटकामध्ये जातीय तेड निर्माण करून आरक्षणावर गदा आणण्याचा हा मनुवादी विचारसरणीचा डाव असून तो हाणून पाहण्यासाठी दि.२७ जुलै रोजी अनुसूचित जाती आरक्षण उप वर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आंबेडकर चळवळीतील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने दि.२७ जुलै २o२६ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय दि.६ जुलै रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला असून यासंदर्भात नियोजन करण्यासाठी दि.९ जुलै रोजी धाराशिव येथील शासकीय विश्राम ग्रह येथे दुपारी ठिक २.oo वा.एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे या प्राथमिक बैठकीत ठरले आहे.
तरी धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकार विद्यार्थी युवा कार्यकर्त व तमाम आंबेडकरी अनुयायाने या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात दि.२७जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे : या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी दि.९.जुलै रोजी धाराशिव येथे बैठकीचे आयोजन.