लातूर येथे स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लातुर शहरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यास विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांची उपस्थिती.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार बसवराज पाटील यांनी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी काळे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देऊन उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर लोकसेवेसाठी शुभेच्छा आ.पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी हभप सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे, सौ. शुभांगीताई काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, अहमदपूर पंचायत समिती सभापती सूरज बाबासाहेब पाटील, जळकोट नगराध्यक्ष सौ. प्रभावती कांबळे, चाकूर नगराध्यक्ष करीमभाई गुळवे, औसा नगराध्यक्ष सौ. परवीन शेख, चाकूर पंचायत समिती सभापती सौ. जयश्रीताई नागरगोजे, उदगीर पंचायत समिती सभापती सौ. वनमाला मारलपल्ले, शिरूर अनंतपाळ उपसभापती सौ. पूनम चव्हाण, चाकूर उपसभापती भुजंगराव शिंदे, अहमदपूर उपनगराध्यक्ष अय्याज शेख, उदगीर नगराध्यक्ष सौ. शीतल शिंदे, अब्दुल शेख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








