डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल ची वाटचाल प्रगती पथावर : राजश्री कदम !
———————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
शिका! संघटित व्हा! संघर्ष करा! हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आत्मसात करत “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग ता.तुळजापूर चे संस्थापक,नगरसेवक तथा न.प. चे विरोधी पक्ष गटनेते मारुती खारवे यांनी सुरू केलेल्या डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्गची शैक्षणिक वाटचाल प्रगतीपथावर असून समाधानकारक आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजश्री कदम यांनी येथे बोलताना केले.
दि. ११ जुलै २o२६ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्क्षा राजश्रीताई कदम यांनी या शाळेला धावती भेट दिली असता त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक दृष्ट्या सुरू केलेली क्रांतिकारी शैक्षणिक चळवळ या अनुषंगाने मारुती खारवे पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न करित आहेत त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. या शाळेची आतापर्यंतची वाटचाल इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकालाची परंपरा आणि निकालाचा आलेख पाहता खूप समाधान वाटले. निश्चितच या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आणि त्यांनी भविष्यात करिअरसाठी निवडलेल्या त्यांच्या क्षेत्रात चमकतील.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,राकेश जेटीथोर,एस.के.गायकवाड उपस्थित होते.







