Best News Portal Development Company In India

श्रीक्षेत्र तुळजापूर: ## विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन; राज्यातील जनतेसाठी मागितले सुख-समृद्धीचे साकडे!

श्रीक्षेत्र तुळजापूर: ## विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन; राज्यातील जनतेसाठी मागितले सुख-समृद्धीचे साकडे!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय उपसभापती श्री. सचिन अहिर यांनी आज (रविवार, दि. १२ जुलै २०२६) सहकुटुंब श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजा – भवानी मातेचे मनोभावे व विधिवत दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी मातेची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले तसेच राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांतता व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
​मंदिर परिसरात आगमन झाल्यानंतर माननीय उपसभापतींचे प्रशासनाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. धाराशिवचे उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. ओंकार देशमुख आणि तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. विनोद गंगणे यांनी श्री. सचिन अहिर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच श्रीदेवीजींची पवित्र प्रतिमा व महावस्त्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
​दर्शन सोहळ्यानंतर उपसभापती श्री. सचिन अहिर यांनी मंदिर परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना मंदिर परिसरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची व नियोजित प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.
​या मंगल प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी बांधव, स्थानिक पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india