Best News Portal Development Company In India

उमरगा येथे एस .टी महामंडळ ७८ व्या वर्धापन दिना रोजी वर्क्षारोपण करण्यात आले.

उमरगा येथे एस .टी महामंडळ ७८ व्या वर्धापन दिना रोजी वर्क्षारोपण करण्यात आले.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
एस .टी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम’ अंतर्गत उमरगा येथे वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालय परिसरात सुमारे हजार ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा एक नवा अध्याय सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना आमदार प्रविण स्वामी यांनी संदेश दिला की, “निसर्गाचे रक्षण हीच खरी लोकसेवा आहे! केवळ झाडे लावणे हा आमचा उद्देश नसून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे जबाबदारीने संगोपन करून आपला परिसर सुजलाम सुफलाम करणे हे आपले कर्तव्य आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात हा हरित उपक्रम आपल्या आरोग्यासाठी आणि भावी पिढीच्या सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल.”
उमरगा आगार परिसरात पार पडलेल्या याप्रसंगी मा.सरपंच राजु सामने उमरगा आगाराचे आगार प्रमुख कुलकर्णी साहेब, सहाय्यक वाहतूक अधीक्षक यशवंत पाटील, वरिष्ठ लिपिक गाडे मॅडम, वाहतूक नियंत्रक नागेश जमादार, वाहतूक नियंत्रक आरती पाठक मॅडम, तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष मनकूरे साहेब, सचिव घोगरे साहेब, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हा सचिव बालाजी पाटील साहेब , महिला कर्मचारी, मेकॅनिक, चालक, वाहक, स्थानिक पदाधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, तरुण मित्र आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रविण स्वामी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले आणि ‘एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया आणि आपल्या महाराष्ट्राला अधिक सुंदर व हिरवेगार बनवूया,’ असे आवाहन केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india