Best News Portal Development Company In India

वैराग्य धाम तीर्थ तुळजापूर येथे धाराशिव ,लातूर, बीड विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांना यथोचित सत्कार सन्मान .

वैराग्य धाम तीर्थ तुळजापूर येथे धाराशिव ,लातूर, बीड विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांना यथोचित सत्कार सन्मान .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल आज तुळजापूर येथील पवित्र वैराग्य धाम तीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार सोहळ्यात सहभागी होत नम्रपणे हा सन्मान आमदार बसवराज पाटील यांनी स्वीकारला.
हा सोहळा केदारपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भीमाशंकर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकारजी यांच्या पावन उपस्थितीत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी पूज्य महाराजांचे लाभलेले आशीर्वाद, स्नेह आणि शुभेच्छा हे माझ्यासाठी अमूल्य असून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत अधिक समर्पितपणे जनसेवा करण्याची प्रेरणा देणारे आहेत. समाजहित, विकास आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा या पवित्र भूमीतून मिळाली, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची बाब असुन
हा सत्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून, माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि जनतेच्या आशीर्वादाचा गौरव आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करण्याचा माझा निर्धार अधिक दृढ झाला आहे असे मत विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांनी व्यक्त केले.

यावेळी राजेश्वर शिवाचार्य महाराज, शिवाचार्य गंगाधर स्वामीजी जेवळी, रामचंद्र रोचकरी, सौ. अर्चनाताई पाटील, सज्जनराव साळुंके, बसवराज पाटील कौळखेडकर, अप्पासाहेब पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, संतोष बोबडे, रामचंद्र आलुरे, रामेश्वर बद्दर, लालासाहेब मगर, आनंद कंदले, गिरीष पाळणे, विशाल रोचकरी, श्रीकांत साखरे, गुरुनाथ बड्डे, भीमाशंकर हासुरे, वैजनाथराव गुळवे, प्रफुल्लतात्या मस्के, विजयकुमार सोनवणे, भैरवनाथ कानडे, गोविंदराव माकणे, लक्ष्मीकांत उळेकर, महाबळेश्वर तोडकरी तसेच असंख्य मान्यवर, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india