Best News Portal Development Company In India

अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा एल्गार; २८ जुलैच्या महामोर्चासाठी वाशीत भीम सैनिकांची वज्रमुठ!

अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा एल्गार; २८ जुलैच्या महामोर्चासाठी वाशीत भीम सैनिकांची वज्रमुठ!
​भूम, वाशी, परंडा अन् कळंबमध्ये भीम सैनिकांचा झंझावाती दौरा; कार्यकर्त्यांना एकवटण्याचे राजाभाऊ ओहाळ यांचे आवाहन!
​तुळजापूर प्रतिनिधी:- अ ब क ड उपवर्गीकरणाच्या विरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच, या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या आगामी महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ‘अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी कृती समिती’ सज्ज झाली आहे. आज, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी, वाशी येथे या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि भव्य बैठक पार पडली. या बैठकीत २८ जुलै रोजी निघणाऱ्या ऐतिहासिक महामोर्चाच्या नियोजनाचे पोस्टर आणि पॅम्पलेटचे (पत्रके) वाटप करण्यात आले. तसेच वाशी तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनी व पुरुषांनी या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
​नेत्यांच्या मार्गदर्शनात आंदोलनाची रणनीती निश्चित
​या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “हा लढा आपल्या हक्काचा असून समाजाच्या वज्रमुठीनेच या उपवर्गीकरणाच्या षडयंत्राला चोख उत्तर दिले जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
​यावेळी व्यासपीठावर आरपीआय धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, भागवत शिंदे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
​भीम सैनिकांचा झंझावाती दौरा!
​महामोर्चाच्या जनजागृतीसाठी आज भीम सैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली होती. भूम, वाशी, परंडा आणि कळंब या प्रमुख ठिकाणी भीम सैनिकांचा झंझावाती दौरा पार पडला. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून २८ तारखेच्या महामोर्चात ताकदीने उतरण्याचे नियोजन करण्यात आले.
​बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
​वाशी येथील या नियोजन बैठकीला आंबेडकरी चळवळीतील व आरपीआयचे अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:-
​विजय सुकाळे, प्रशिक सुरेंद्र गायकवाड, दिलीप गरड, प्रशांत सूर्यभान गायकवाड
​अशोक इंगोले, उद्धव सतीश गायकवाड, बाबुराव किशोर गायकवाड, अविनाश साहेबराव सुकाळे
​अमोल गायकवाड, विशाल गायकवाड, विलास गायकवाड, संदेश गायकवाड
​सुजित सुकाळे, गोकुळ लेकडे, अभिषेक बनसोडे, बाप्पा सुकाळे, प्रदीप अंकुश सुकाळे
​माणिक गायकवाड, भीमा गायकवाड, सुमित गायकवाड, सोमा पारडे, सुजित हजारे
​यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील असंख्य निष्ठावंत पदाधिकारी व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २८ जुलै रोजी होणारा हा महामोर्चा ऐतिहासिक आणि यशस्वी करण्यासाठी वाशी तालुक्यातून विक्रमी संख्येने समाजबांधव रवाना होणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india