Best News Portal Development Company In India

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई !

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई !
तुळजापूर प्रतिनिधी:- दिनांक 13/07/2026 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कुमाळवाडी शिवारात एक पुरुष जातीचे प्रेत पडलेले आहे आशी फोन द्वारे माहिती मिळाल्याने धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ व स्टाफ घटनास्थळी रवाना झाले. मौजे कुमाळवाडी शिवारातील सदर घटनास्थळी एक 40 ते 45 वर्ष वयोगटातील पुरुष जातीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात मयत अवस्थेत पडलेले दिसले. यावरून सदर ईसमाचा कोणीतरी खुन केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. सदर ठिकाणी घटनास्थळाचे बाजूला एक हिरो होन्डा स्पलेंडर मोटार सायकल उभी होती. सदर मोटार सायकलच्या मालकाचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर काढुन मयताची ओळख पटवली. मयताचे नाव दगडू देशमुख राहणार येडशी असे असल्याचे समजले.
सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खरोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राउत साहेब यांना लागलीच देऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील तपास चालु केला.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत साहेब व स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार व पथक सुद्धा घटनास्थळी आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तपासामध्ये संशयीत आरोपी व मयताची पत्नी यांचे अनैतिक प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली, त्यावरुन आम्ही संशयीत आरोपी नामे बालाजी महादेव पायघन वय 35 वर्षे रा. सातनाक वस्ती, पांगरी ता. बार्शी जि. सोलापुर याचा शोध घेतला असता तो त्याच्या मेहुण्यासोबत पुणे येथे गेला असल्याचे समजले. पुणे पोलिसांच्या मदतीने नमुद संशयित आरोपीत बालाजी चा शोध घेतला असता तो त्याचा दुसरा साथीदार सोमनाथ सातनाक याच्यासोबत मिळून आला. सदरचा खून मयताच्या पत्नीच्या सांगण्यावरून बालाजी व सोमनाथ या दोघांनी चाकूने वार करून व दगडाने ठेचून केला असल्याचे सांगितले. आरोपी बालाजी महादेव पायघन, सोमनाथ सातनाक व मयताची पत्नी दैवशाला संतोष देशमुख यांना नमूद गुन्ह्यात अटक केली असून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खरोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राउत यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ, पोलीस हवालदार माचेवाड, खोसे, गादेकर, ढगारे, घुगे, पोलीस नाईक सावंत, पोलीस शिपाई पडवळ, आरसेवाड, स्वामी, गवळी, बनाळे, महिला पोलीस हवालदार बांगर, सोन्ने आदींनी पार पाडली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india