Best News Portal Development Company In India

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सोनम वांगचूक यांना समर्थन; ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन!

*NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सोनम वांगचूक यांना समर्थन; ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

उमरगा/ लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच दिल्ली येथील जंतर-मंतरवर उपोषणास बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री. सोमन वांगडूक यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, उमरगा यांच्यामार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात पारदर्शक चौकशी करून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ऍड. शीतल चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, ऍड. अमोल सूर्यवंशी, प्रतिभा पनूरे-शिंदे, शबाना शेख, करिम शेख, किशोर बसगुंडे, विजय चितली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्तिक सूर्यवंशी, समाधान सुरवसे, समर्थ वाघमारे, संघपाल लोंढे, राम सास्तुरे, दादाराव दुधाभाते, चेतन गायकवाड, रवी गायकवाड, किरण जाधव, उत्कर्ष बनसोडे, यश जमादार हे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांनी निवेदनाला पाठिंबा दर्शवत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india