कळंब पोलिसांची मोठी कारवाई: चोरीच्या ४ मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद!
तुळजापूर प्रतिनिधी :- कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्याची एकूण किंमत ७०,०११ रुपये इतकी आहे. लखन उर्फ रमेश उत्रेश्वर दळवी (रा. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कळंब पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली. धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रं फिरवण्यात आली.
कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शेख, पोलीस हवालदार अजीज शेख, जुबेर काझी, पोलीस अंमलदार परमेश्वर कदम आणि अमोल माळी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे लखन उर्फ रमेश दळवी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
४ गुन्हे उघडकीस
आरोपीच्या अटकेमुळे कळंब पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे:
गुन्हा क्र. ११५/२०१५
गुन्हा क्र. २८७/२०२६
गुन्हा क्र. २८६/२०२६
कर्नाटक पासिंगची एक ‘ट्विस्टर’ मोटारसायकल
पोलिसांनी आरोपीकडून ७०,००० रुपये किमतीच्या या चारही मोटारसायकली जप्त केल्या असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास कळंब पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





