Best News Portal Development Company In India

चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व भोजनदान अशा विविध सामाजिक उपक्रमाने केला वडिलांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा : लोखंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!

चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व भोजनदान अशा विविध सामाजिक उपक्रमाने केला वडिलांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा : लोखंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
युगपुरुष तरुण मंडळ व समस्त लोखंडे परिवार जळकोट ता. तुळजापूर च्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) तुळजापूर तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य पत्रकार अरुण लोखंडे यांचे वडील दिवंगत नारायण तुकाराम लोखंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळकोट ता.तुळजापूर येथिल आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत नारायण तुकाराम लोखंडे उर्फ अण्णा यांच्या द्वितीय स्मृती दिनाच्या निमित्ताने आपलं घर अलियाबाद नळदुर्ग येथिल अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, भोजनदान व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ कार्यकर्ते उत्तरेश्वर फरीदा जानराव माढा जिल्हा सोलापूर यांचा सत्कार व मार्गदर्शन पर भाषणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्मृतीशेष नारायण लोखंडे अण्णा यांना आदरांजली वाहण्यात आली.
. सकाळी पहिल्या सत्रात नळदुर्ग नगर परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते नगरसेवक मारुती खारवे यांच्या अध्यक्षतेखाली तर माझी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते महेश कदम,अनिल गायकवाड सर, बबन मोरे,कैलास गवळी गुरुजी,दत्तात्रय कांबळे,यववंत कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर,थोर समाजवादी नेते स्मृतीशे पन्नालाल भाऊ सुरांना व स्मृतीशेष नारायण लोखंडे अण्णा यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कैलास गवळी गुरुजी गणेश सोनटक्के महेश कदम आदींची आदरांजली पर भाषणे झाली. यानंतर सर्व अनाथ विद्यार्थी व उपस्थित कार्यकर्ते यांना भोजनदान देण्यात आले.
तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम चे संचालक भालचंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर सामाजिक कार्यकर्ते तथा लोकशाही पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष पत्रकार धीरज बेळमकर, सामाजिक कार्यकर्ते पिंटू पुदाले,आपलं घर चे व्यवस्थापक संदीप चौले,आरपीआय (आठवले) उमरगा शहर उपाध्यक्ष संजय कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर जानराव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना जानराव म्हणाले की आई-वडिलांची सेवा व कुष्ठ रुग्णांची सेवा रंजल्या गांजल्यांची सेवा हीच खरी समाजसेवा असून मला प्रामाणिकपणे कुष्ठरोग्यांची सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले असून आपण याप्रसंगी माझा सत्कार करून जो सन्मान केला तो अविस्मरणीय राहील.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीआय (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा पत्रकार एस के गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश सोनकांबळे यांनी केले.
यावेळी रिपाइं आठवल्याचे गजेंद्र डावरे,उत्तम भालेराव युगपुरुष तरुण मंडळाचे प्रदीप लोखंडे,स्वदेश लोखंडे सुनील माने,नवनाथ लोखंडे प्रकाश लोखंडे,अरविंद लोखंडे,परमेश्वर लोखंडे, योगेश लोखंडे,महादेव लोखंडे महिला कार्यकर्त्या मनीषा गायकवाड, सोनल भालेराव, वर्षा भालेराव,जया माने, पार्वती गायकवाड सह कार्यकर्ते महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व भोजनदान अशा विविध सामाजिक उपक्रमाने केला वडिलांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा : लोखंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!