Best News Portal Development Company In India

तुरोरीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवनिर्वाचित जि. प. सदस्याचा सत्कार व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप समारंभ संपन्न !

*तुरोरीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवनिर्वाचित जि. प. सदस्याचा सत्कार व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप समारंभ संपन्न*

तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
दि १८ रोजी तालुक्यातील तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात अनाथ , एकल पालक , गोरगरीब , हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे दात्यांच्या हस्ते नवनिर्वाचित तुरोरी गणातील जि. प.सदस्या सौ.अर्चनाताई युवराज जाधव यांच्या सत्कारानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाला ज्ञानदीप शिक्षण संस्था तुरोरीच्या अध्यक्षा अरुणाकाकू देवीदासराव जाधव-माडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. धाराशिव च्या सदस्या अर्चनाताई युवराज जाधव , पंचायत समितीचे माजी उपसभापती युवराज(दाजी) जाधव,संचालक विठ्ठलाप्पा जाधव , माजी प्राचार्य एस.वाय. जाधव, एन.एम.माने, एच.व्ही पवार,अभिजित जाधव-माडीवाले, ग्रामपंचायत सदस्य विकास (दादा )जाधव, माजी उपसरपंच पंडित शिंदे, पत्रकार बालाजी माणिकवार,माजी प. स.सदस्य अभय माने, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दयानंद सूर्यवंशी ,दुग्ध व्यावसायिक प्रफुल्ल साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे अर्चनाताई युवराज जाधव यांनी बोलताना असे व्यक्त केले की,जि. प.सदस्या म्हणून काम करत असताना समाजाचे हित व विकास हे ध्येय बाळगून आम्ही कार्य करत आहोत.हे करत असताना जिल्यातील शाळा व विद्यार्थ्यांचा विकास हे प्रमुख उद्दिष्टापैकी एक असून आपल्या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचवण्याचे कार्य आम्ही करू.जास्तीत जास्त विद्यार्थी शालेय प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम नागरिक बनवण्यासाठी कार्य करू अशी हमी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक डॉ.गजेंद्र मुगळे यांनी केले.अध्यक्षीय समारोप प्राचार्या एस.एम.अहिरे यांनी तर उपस्थितांचे व देणगीदार दात्यांचे आभार जेष्ठ विज्ञान शिक्षक शिवाजी जाधव यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व भोजनदान अशा विविध सामाजिक उपक्रमाने केला वडिलांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा : लोखंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम!