Best News Portal Development Company In India

शिक्षणाचे लेणे, गरजूंच्या दारी; मुरूमच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम…

शिक्षणाचे लेणे, गरजूंच्या दारी; मुरूमच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम…

उमरगा/लोहार प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

​समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उद्देशाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (दि. १९) रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके वाटपाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
​सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक हुशार मुले केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात. हे ओळखून फाउंडेशनने पुढाकार घेतला. गरजू विद्यार्थिनींना इयत्ता दहावीच्या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे निरागस भाव उमटले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका विजया बेलकेरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संत निरंकारी मिशन केवळ आध्यात्मिक विचारांचा प्रसार करत नाही, तर मानव कल्याणासाठी शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजे भविष्यातील एका जबाबदार नागरिकाला घडवणे होय.
शालेय पुस्तकांचे मोफत वाटप झाल्यामुळे पालकांनी फाउंडेशनच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. या उपक्रमामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळा दूर झाला असून, त्यांना आता अधिक उत्साहाने अभ्यासाला लागता येईल.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक संत निरंकारी मिशनच्या सेवा समितीचे पदाधिकारी, सेवादार यांनी विशेष परिश्रम घेतले. ​याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, रोटरी क्लब मुरूमचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, ब्रांच मुखी दयानंद साखरे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका सोनाली कलशेट्टी, मीरा मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीला पुस्तकांच्या संचाचे वाटप विजया बेलकरी यांच्या हस्ते करताना सोनाली कलशेट्टी, मीरा मोटे, सुधीर पंचगल्ले, महेश मोटे व दयानंद साखरे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india