Best News Portal Development Company In India

किशोर धुमाळ यांची ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट्स पीस डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड!

किशोर धुमाळ यांची ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट्स पीस डेव्हलपमेंट असोसिएशन’च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड!
​सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल; जिल्हाध्यक्ष रामेश्वर डोंगरे यांच्याकडून नियुक्ती
​नळदुर्ग (प्रतिनिधी): मानवी हक्कांचे संरक्षण, शांतता, विकास आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या (इंटरनॅशनल ह्युमन राईट्स पीस डेव्हलपमेंट असोसिएशन’)च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी वागदरी (ता. तुळजापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किशोर पांडुरंग धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​किशोर धुमाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्याचा आणि पत्रकारितेचा प्रभावी वापर करून सामान्य, वंचित घटकांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. विविध शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
​त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि तत्परतेची दखल घेऊन संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रामेश्वर अरुण डोंगरे यांनी त्यांच्याकडे तुळजापूर तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
​”सामान्य नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे हीच माझी प्राथमिकता राहील,” अशी भावना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किशोर धुमाळ यांनी निवडीनंतर व्यक्त केली.
​धुमाळ यांच्या या सार्थ आणि योग्य निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यासह मित्रपरिवार, पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india