डॉ. इंद्रजीत गायकवाड ॲक्युपंक्चर रत्न पुरस्काराने सन्मानित
—————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
वागदरी ता. तुळजापूर येथील रहिवासी असलेले व सध्या पिंपरी पुणे येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध डॉ.इंद्रजीत गायकवाड यांना नुकतेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए मार्फत अतिशय प्रतिष्ठेचा
महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६ मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )तेथे देवून सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर इंद्रजीत गायकवाड यांनी ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीनुसार आतापर्यंत अनेक रुग्णांना ची समाधानकारक सेवा केलेली असून ज्यांचे हात पाय जागेवरून हलवता येत नव्हते अशा अनेक रुग्णांना त्यांनी बरे केल्याचे उदाहरणे आहेत पुण्यासारख्या शहरात त्यांची प्रॅक्टिस चालू असली तरी अधून मधून आपल्या गावाकडे आले तर त्यांच्याभोवती रुग्णांची नेहमीच गर्दी असते.अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आवर्जून येतात कसल्याही प्रकारचे केमिकल औषध नाही किंवा गोळ्या नाहीत त्यामुळे अलर्जी किंवा इन्फेक्शन वगेरे होण्याचा धोका नाही अशा ॲक्युपंक्चर उपचार करण्यात त्यांचा मोठा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार म्हणजे ॲक्युपंक्चरिस्ट कार्याचा हा मोठा सन्मान आहे.
या पुरस्काराला महाराष्ट्रातील ॲक्युपंक्चर थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये मराठी सिने कलावंत डॉ. सुयोग गोऱ्हे ,ॲड.नाझेर काझी साहेब प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
ॲड. दत्तात्रय जाधवर, ॲड नागेश सोनुने,
तर मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये चेअरमन डॉ सतीश कराळे,डॉ नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे,
डॉ अभिजित कवठकर, श्री प्रशांत सावंत, सौ दिशा चव्हाण,श्री विजय नवल पाटील, श्री तुषार वाघूळदे,डॉ राजेंद्र गोऱ्हे
व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉक्टर इंद्रजीत गायकवाड यांना हा कार महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून त्यांनचे कौतुक होत त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.







