Best News Portal Development Company In India

तुळजाभवानी सैनिक विद्यालयात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न!

तुळजाभवानी सैनिक विद्यालयात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न!
​तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित, तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर येथे आज दिनांक २१ जुलै २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर यांच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
​विद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोडके सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
​या शिबीरामध्ये केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे, तर शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, मेस (भोजनगृह) विभागातील कर्मचारी तसेच बी.व्ही.जी. (BVG) कर्मचाऱ्यांचीही सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरा मध्ये प्रामुख्याने.
​ब्लड प्रेशर (रक्तदाब) तपासणी
​शुगर (रक्तातील साखरेचे प्रमाण) तपासणी
​जनरल हेल्थ (सामान्य आरोग्य) चेकअप
​तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक व आरोग्य मार्गदर्शन
​उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आलेल्या वैद्यकीय पथकात डॉ. वारुळे, नर्सिंग सुपरवायझर सुरवसे मॅडम आणि फार्मासिस्ट पाथरूड यांचा समावेश होता.
​आरोग्य तपासणीदरम्यान डॉ. वारुळे यांनी उपस्थितांना बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. “पावसाळ्याच्या दिवसांत पसरणारे आजार, दूषित पाणी आणि बदलत्या वातावरणामुळे होणारे संसर्ग यापासून बचाव कसा करावा, दैनंदिन आहारात व दिनचर्येत कोणते बदल करावेत,” याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
​प्राचार्यांचे संदेश:-विद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोडके सर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत तंदुरुस्त शरीरातच तंदुरुस्त मन वास करते, त्यामुळे सैनिकी शिस्तीसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. वैद्यकीय पथकाचे आभार मानून त्यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
​आरोग्य तपासणी व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या शिबीरामुळे विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी नवी जागरूकता निर्माण झाली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india