मा. अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे यांची श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास सदिच्छा भेट; स्वच्छता व शिस्तीबद्दल व्यक्त केले समाधान!
तुळजापूर प्रतिनिधी;- वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित, श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास आज (दि. २२ जुलै २०२६) मा. अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. उपेंद्र तामोरे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यालयातील विविध विभागांची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
विद्यालयाचा विस्तीर्ण परिसर, परिसरातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची उत्कृष्ट सैनिकी शिस्त पाहून मा. तामोरे यांनी विशेष समाधान व्यक्त केले. या भेटी दरम्यान त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैजनाथ घोडके यांच्याशी सकारात्मक सुसंवाद साधून शाळेच्या शैक्षणिक व सैनिकी उपक्रमांबद्दल सविस्तर चर्चा केली.
वृक्षारोपण व सत्कार सोहळा
या प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंदिर संस्थानचे लेखाधिकारी श्री संतोष भेंकी, प्रवीण अमृतराव, नागेश शितोळे व अनिल चव्हाण यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच, विद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वैजनाथ घोडके यांच्या हस्ते मा. अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे यांना ‘पुस्तक भेट’ देऊन त्यांचा भावुक व स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला.
डॉ. घोडके सरांच्या शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत शिक्षण प्रणाली मुळे आज श्री तुळजाभवानी सैनिक महाविद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत मोठ्या पोस्टवर आपली सेवा बजावत आहेत. हे कार्य सुद्धा कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





