Best News Portal Development Company In India

स्व.अजितदादांच्या जयंती निमीत्त बलसुर येथे सर्वरोग निदान व कर्करोग तपासणी शिबिर संपन्न!

स्व.अजितदादांच्या जयंती निमीत्त बलसुर येथे सर्वरोग निदान व कर्करोग तपासणी शिबिर संपन्न!

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त सर्व रोग निदान व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन बलसुर येथे दि २२ रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते . या शिबीरीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेशदाजी बिराजदार , स्पर्श रुग्णालयाचे डॉ. रमेश जोशी , कॅन्सर तज्ञ डॉ रमेश बंग , नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ .अपर्णा सरवदे ,आय एम ए चे डॉ .प्रशांत मोरे , डॉ . विजय बेडदुर्गे , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पंडीत बुटूकणे , डॉ .माशाळकर, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ . लक्ष्मण कुंडले ,तात्याराव मोरे फार्मसी महाविद्यालयाचे प्रा . कवलजीत बिराजदार यांच्यासह डॉक्टर , कर्मचारी उपस्थित होते .
प्रा . बिराजदार यांनी बोलताना “दादांच्या जयंतीनिमित्त सबंध महाराष्ट्रात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . दादांची ओळख कामाचा माणूस म्हणून होती दादांना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातूनच श्रद्धांजली अर्पण करीत आहोत असे भावपूर्ण उद्गार काढले तर उमरगा लोहारा तालुक्यात सर्व रोग निदान शिबिर ,मोतीबिंदू नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर ,महिलां मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर ,रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण,स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगीतले . डॉ जोशी यांनी बोलताना दादांच्या कार्याचा अनुभव सांगत ,दादांच्या जान्याने महाराष्ट्राची न भरुण येणारी फार मोठी हानी झाली आहे अशा भावना व्यक्त केल्या . शिबिराचे उद्घाटन स्व .अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आले .या सर्वरोग निदान व कर्करोग निदान शिबिरासाठी ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते .रक्तदाब , वजन ,रक्ताच्या विविध चाचण्या यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनींची विषेश आरोग तपासणी करण्यात आली . या शिबीरात बलसुर ,कडदोरा ,समुद्राळ , कलदेव लिंबाळा , व्हंताळ , एकुरगा ,रामकृष्ण नगर ,भाऊसाहेब नगर आदी गावातील रुग्णांनी सहभाग नोंदवला .
यावेळी डॉ . युवराज हाक्के , डॉ . अतुल गंडाळे , डॉ आकाश कांबळे ,डॉ मुसा मुजावर ,डॉ दीपक साखरे ,डॉ ललिता घोडके ,डॉ करुणा पुरील ,सूर्यकांत घंटे , अजिंक्य कांबळे ,मिलन सुरवसे ,सचिन चव्हाण ,सोनाली सगर ,शुभांगी तिकांबरे ,सुजाता बरमदे ,पूजा कराळे ,शुभांगी गायकवाड ,श्रीनिवास जाधव , मनोहर माळी ,कविता घोणे ,वर्षा साळुंके ,आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा स्वयंसेविका ,यांच्यासह जि प सदस्य रोहिणी कोकणे , पं स . सदस्य मालन कांबळे ,नगरसेविका दिपाली बिराजदार ,साहेबराव पाटील ,सुनिता पावशेर ,सुनील साळुंखे , शमशोद्दीन जमादार ,भीमा स्वामी ,बापू बिराजदार , प्रशांत सोमवंशी ,नेताजी कवठे ,सुभाष गायकवाड ,मारुती पाटील ,शंतनू सगर , फैय्याज पठाण ,प्रताप महाराज ,अजित पाटील ,रणजीत बिराजदार ,ज्योतीराम औरादे ,विजय पाटील ,प्रदीप गावकरे ,अभय पाटील ,पवन पाटील , माधव नांगरे ,सत्यनारायण जाधव ,आयुब पटेल , प्राचार्य सतीश वाकडे ,वसंत साखरे ,पद्मसिंह सोमवंशी ,तुषार पाटील आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india