नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील सर्व आरोपीवर कडक कारवाई करावी व जंतर-मंतर नवी दिल्ली येथील विद्यार्थ्यांचा आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना त्वरित निलबित करा : रिपाइं (आठवले) ची मागणी
————————————————-
नळदुर्ग (एस.के. गायकवाड ):
नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी व जंतर-मंतर नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्य प्रकरणातील पोलिसावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तुळजापूरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार तुळजापूर मार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
. या बाबत तुळजापूर ये तहसिलदार याना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर च्या वतीने देण्यान आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नीट परिक्षेचे पेरपर फूटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारून केंद्रिय शिक्षण मंत्री धामेंद्र प्रधान यानी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काक्रोच जनता पार्टीचे आभिजीत दिपके व संशोधक सोनम वांगचूक यानी जंतर मंतर नवी दिल्ली येथे अमरण उपोषण आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनास पाठिबां देण्यासाठी विदयार्थानी फार मोठे जनांदोलन जंतर मंतरवर उभे केले होते. हे विद्यार्थांचे आदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीसानी नाहक अश्रुधुराच्या नळकांडया फोडून बेछूट लाठी चार्च केला. या लाठी चार्य प्रकरणाचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यान येत असून पेपर फूटी प्रकरणातील सर्व अरोपीवर कडक कारवाई करा तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्च करणाऱ्या जबाबदार पोलीस कर्मच्याऱ्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी असी मागणी करण्यात येत आहे.
रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसिलदार यांच्या मार्फत देण्यात पंतप्रधान नरेंद मोदी याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं (आठवले) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम, रिपाइं जिल्हा चिटणीस
एस. के.गायकवाड,जेष्ठ जिल्हा सदस्य बाबा कदम, रिपाइं युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशिल कदम, तालुक उपाध्यक्ष किसन पांडागळे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजीनाथ पांडागळे, रिपाइंचे भिमराव सोनवणे, सुरेंद्र करम,महादेव जेटीथोर सह कार्यकर्त्यांच्या सहया आहेत.








