श्रावण बाळ, संजय गांधी अर्थ सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना नियमित पगार (मानधन) द्यावे : अन्यथा आंदोलन करण्यात येईल रिपाइं (आठवले ) पक्षाचा इशारा
————————————————
नळदुर्ग (एस. के.गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील श्रावण बाळ,संजय गांधी व इंदिरा गांधी अर्थसाह्य योजनेतील वृद्ध विधवा निराधार गोरगरीब लाभार्थ्यांना दिले जाणारे मानधन (पगार ) गेल्या सहा सात महिन्यापासून मिळाले नाही. तेंव्हा या योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित मानधन देण्याची व्यवस्था शासनाने करावी अन्यथा या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने लाभार्थ्या समवेत आंदोलन करण्यात येईल अशी मागणी रिपाइं (आठवले) तुळजापूरच्या वतीने तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
. या संदर्भात तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील अनेक गोरगरीब लाभार्थी संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावण बाळ योजनेतील मानधनापासून गेल्या सात आठ महिन्यापासून वंचित आहेत. नियमित मानधन चालू असताना ते अचानक बंद झाले याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता वारंवार तेच सांगतात की या योजनेची साईड चालत नाही डेबिट बंद आहे व इतर कारणे सांगून लाभार्थ्यांना माघारी पाठवले जाते त्यांच्या मागणीचे म्हणावे तसेच समाधान केले जात नाही लाभार्थ्यांचे तहसील कचेरीकडे चकरा मारून टाचा झिजून गेले आहेत जातकाप्रमाणे अनेक लाभार्थी या मानधनाची वाट पाहत आहेत. तेंव्हा डिबीट कधी चालू होणार त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या कधी दूर होणार त्यांना नियमित मासिक मानधन कधी मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
. तरी शासनाने या कडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन वृद्ध गोरगरीब विधवा निराधार लाभार्थ्यांना अचानकपणे बंद झालेले मानधन पुर्ववत नियमित विनाअट सुरू करावे. अशी मागणी रिपाइं आठवले च्या वतीने करण्यात येत असून जर त्वरित या योजनेतील लाभार्थ्यांना मानधन दिले नाही तर लाभार्थ्यासमवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी या निवेदनात देण्यात आला आहे.
तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं (आठवले ) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा कदम,युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशील कदम, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, भीमराव सोनवणे,सुरेंद्र कदम महादेव जेटीथोर,सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.







