Best News Portal Development Company In India

बलसुर येथे विविध विकासकामांचे प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते भुमीपुजन!

बलसुर येथे विविध विकासकामांचे प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते भुमीपुजन!

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील बलसुर येथील भाऊसाहेब नगर व रामकृष्ण नगर येथे जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते दि २४ रोजी करण्यात आले .यावेळी जि प सदस्य सविता बिराजदार , सरपंच अश्विनी भोसले , उपसरपंच अयुब पटेल, साहेबराव पाटील ,शमशोदीन जमादार ,इंजी. आर सी चव्हाण ,इंजी. बन्सीलाल चव्हाण ,ग्रामसेवक सुधीर कदम ,इंजी .पाटील यांची उपस्थिती होती .
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत बलसुर येथील भाऊसाहेब नगर तांडा येथे भिल्लू राठोड ते राजेंद्र राठोड यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले तर रामकृष्ण नगर तांडा येथे सेवालाल मंदिर ते नारायण गोपा चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता कामाचे भूमिपूजन प्रा .बिराजदार यांच्या हस्ते संपन्न झाले .मागील अनेक वर्षापासून या रस्त्यांच्या कामाची मागणी ग्रामस्थातून होत होती .हा रस्ता होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील दत्ता चव्हाण किसन चव्हाण ,वसंत साखरे ,प्रदीप पाटील ,सत्यनारायण जाधव ,पवन पाटील ,माधव नांगरे ,गुरुलिंग वाकडे ,राजू राठोड ,चंद्रकांत भोसले बळीराम नांगरे , वामन राठोड , अक्षय चव्हाण ,शरद पवार , विष्णू चव्हाण , श्रीमती जुगल ,चव्हाण बंटी , श्री शित्रे , गोविंद चव्हाण , नारायण चव्हाण ,किसन राठोड ,किसन चव्हाण नामदेव चव्हाण , भास्कर राठोड ,दत्ता चव्हाण , विष्णू चव्हाण गावातील व तांड्याती पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india