हडपसर पोलीस स्टेशनला ‘भगवा प्रांत’चे मुख्य संपादक उमेश काळे विलास यांची सदिच्छा भेट!
तुळजापूर प्रतिनिधी :- ‘भगवा प्रांत’ या साप्ताहिकाचे मुख्य संपादक उमेश काळे विलास यांनी नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलांतर्गत येणाऱ्या हडपसर पोलीस स्टेशनला (पुणे) सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि दैनिक ‘भगवा प्रांत’च्या प्रतिनिधींमध्ये विविध सामाजिक विषयांवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात सकारात्मक संवाद झाला.
या विशेष प्रसंगी सुरवसे ज्ञानेश्वर, सगर महादेव, टेकाळे असीम, शेख अमोल आणि सोनटक्के हे मान्यवर उपस्थित होते. तसेच पत्रकार संतोष दुधभाते यांचीही या भेटीदरम्यान विशेष उपस्थिती होती.
पोलीस दल आणि प्रसारमाध्यमे हे समाजातील महत्त्वाचे घटक असून, सामाजिक सलोखा राखण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही यंत्रणांमधील परस्पर सहकार्य अत्यंत गरजेचे आहे, असा सूर या वेळी झालेल्या चर्चेतून उमटला.
भेटीच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले व पोलीस प्रशासनाच्या वतीने या सदिच्छा भेटीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.








