गंधोरा येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत कमी दरात कृषी पंप वाटप!
गंधोरा: लोकनेते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंधोरा गावामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी दरामध्ये औषधी फवारणी कृषी पंपांचे मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व ही महत्त्वपूर्ण योजना गावामध्ये राबवण्यासाठी पांडुरंग सोनटक्के यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व गोपाळभैय्या सुरवसे यांच्याशी थेट चर्चा करून पुढाकार घेतला.
सत्कार व प्रमुख उपस्थिती:
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले जि.प. सदस्य गोपाळभैय्या सुरवसे यांचा सत्कार पांडुरंग सोनटक्के यांनी केला. तसेच सलगरा दि. येथील शिवसेना नेते शाम भैय्या माळी यांचा सत्कार गंधोरा गावचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती
संचालक संजयजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी गावातील आदर्श व्यक्ती प्रवीण पाटील, सुख-दुःखात सदैव धावून जाणारे मनोज भोसले, विनोद भोसले, लखन एकडे, पोलीस पाटील,सालार शेख, मालोजी मुसळे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते हा कृषी पंप वाटप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
शेतकरी सुखी, तर बळीराजा सुखी! 







