Best News Portal Development Company In India

जकेकुर येथे बालवारकऱ्यांच्या ग्रंथ दिंडी आणि शिक्षणाच्या वारीने आषाढी एकादशी साजरी….

जकेकुर येथे बालवारकऱ्यांच्या ग्रंथ दिंडी आणि शिक्षणाच्या वारीने आषाढी एकादशी साजरी….

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. जकेकूर येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशामध्ये मध्ये ग्रंथदिंडी सोबतच वृक्ष दिंडी काढली. विठुरायाच्या नाम गजरा सोबतच शैक्षणिक घोषवाक्य, वृक्ष संवर्धन विषयाचे घोषवाक्य, वाचन संस्कृती विषयक घोषवाक्यांनी परिसर दणदणून गेला.

या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांसह गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनीही सहभाग घेतला. ग्रंथदिंडीसह विठ्ठल रुक्मिणीच्या, वारकऱ्यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी, लेझीम पथक, टाळपथकाने या दिंडीची शोभा वाढवली.

या दिंडीच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सरिता उपासे सह शिक्षकवृंद सुधाकर चव्हाण, श्रीमती चैनसबी अत्तार, श्रीमती. रेषाबाई मड्डे, उध्दव सुर्यवंशी, तुळशीदास पांचाळ, अतूल सगर, कृष्णा माळी, श्रीमती. नागिन शिंदे, श्रीमती. कविता देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india