Best News Portal Development Company In India

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन!

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

दि.(२७)विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, पोलिस भरती, बँकिंग, रेल्वे , तसेच इतर स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी, या उद्देशाने करिअर कट्टा सेंटर फॉर एक्सलन्स श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना तलाठी, पोलिस, ते स्टाफ सिलेक्शन, बॅंकिंग, MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहावे, करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा केंद्रात सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मैदानी सराव, नियमित मार्गदर्शन वर्ग आणि करिअर कट्टा ऑनलाईन क्लास या बरोबर पुस्तकासह अभ्यासिका याची सोय नाममात्र शुल्कात आहे. विद्यार्थ्यानी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास ठेवला तर तीन वर्षात स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल असे आवाहन डॉ अस्वले यांनी केले. यावेळी महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संदर्भग्रंथ, वर्तमानपत्रे, मासिके, डिजिटल अध्ययन सुविधा आणि नियमित मार्गदर्शन वर्गांची पोलिस अकॅडमी ची आणि विशेष स्टाफ ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, अभ्यास साहित्य तसेच सराव परीक्षा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. अर्जुन कटके ,प्रा.डॉ. चंद्रसेन करे ,स्पर्धा परीक्षेचे सहसमन्वयक प्रा. डॉ. राम जाधव,सुरवसे मॅडम, गायकवाड मॅडम, पूजा कटके मॅडम तसेच विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले यांनी केले, तर आभार प्रा. आशिष घंटे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india