Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी अरुण लोखंडे यांची निवड!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय सचिवपदी अरुण लोखंडे यांची निवड!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या मराठवाडा विभागीय सचिव / संपर्कप्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर तुळजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
​संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन ही घोषणा केली.
​पत्रकार संघाचे ध्येय-धोरण आणि उद्दिष्टे लक्षात ठेवून मराठवाडा विभागात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी श्री. लोखंडे हे नेहमी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
​श्री. अरुण लोखंडे यांच्या या नियुक्तीबद्दल पत्रकार संघ, विविध सामाजिक संस्था, राजकीय तसेच प्रशासकीय वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी त्यांना उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india