बी. एसी. पदवीधर वर्ग मित्रांचा ३५ वर्षानंतर स्नेह मेळावा : डॉ दस्तगीर मुजावर यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार!
—————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता. तुळजापूर येथील सन १९९o – ९१ मध्ये बी.एस्सी.पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व वर्गमित्र ३५ वर्षानंतर एकत्र येऊन मित्रत्वाचा आनंद घेतला.तो क्षण म्हणजे मित्रत्वाचा आनंदी मेळवा असचं म्हणावे लागेल.
बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर संचलित कला विज्ञान व महाविद्यालय नळदुर्ग येथे सन १९९o – ९१ या शैक्षणिक वर्षात बी.एस्सी. पदवी घेवून बाहेर पडलेल्या फिशरी ग्रुप मधील२० वर्गमित्र३५वर्षानंतर फुलवाडी येथील साई प्लाझा हॉटेल मध्ये एकत्र येऊन एक स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला.
आपल्या महाविद्यालयीन जीवना मधील जुन्याआठवणींना उजाळा दिला.मित्र असावा गारव्यासारखा,जगाच्या पाठीवर रोज हजारो लोक भेटतात,पण रोज न भेटताही मनापासून आठवण काढणारी माणस फक्त्त भाग्यवंताना मिळतात ते म्हणजे मित्र असतात.अशा भावना प्रत्येकाने यावेळी व्यक्त केल्या.या प्रसंगी खानापूर ता. तुळजापूर येथिल आपला वर्ग मित्र डॉ.दस्तगीर मुजावर हा नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाल्यामुळे त्यांचा सर्व मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
बालाघाट महाविद्यालयाच्या मत्स विभागाच्या सन १९९० – ९१ या शैक्षणिक वर्षातील वर्ग मित्राच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरित्री विद्यालयाचे सचिव ॲड. सयाजी शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल साई साखर कारखान्याचे अधिकारी राजेंद्र काळाप्पा,माजी जि.प.सदस्य वसंतराव वडगावे,जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचे संस्थापक महेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ दस्तगीर मुजावर यांनी तीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक जाणिवेतून उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात सेवावृत्तीनंतरचे आयुष्य व केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सिध्देश्वर बाड यांनी केले, सुत्रसंचलन डॉ प्रसन्न कंदले यांनी तर आभार एस.के. गायकवाड यांनी मानले.
या वेळी डॉ.प्रा.दिपक जगदाळे,मिलींद कुलकर्णी,
सोमनाथ गायकवाड, राहुल लिमये,उध्दव कोठे, किसन साखरे,सुधीर पाटील,धनराज बरबडे,संजय पंडीत,डॉ.आनंद काटकर, प्रविणकुमार भोळे, राजकुमार बिरादार,विशाल कदम, संस्कार उपासे आदी उपस्थित होते.







