Best News Portal Development Company In India

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आज रोजी धाराशिव जिल्ह्यात

देवेंद्र फडणवीस,
अजित पवार आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
धाराशिव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे हेही दौऱ्यावर असते.
भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा विवाह (२२-नोव्हेंबर) रोजी साध्या पद्धतीने सिंदफळ येथे होत आहे. तत्पूर्वी घरातील समारंभास हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दुपारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या घरी उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आसपासच्या राजकीय सभा करिता शिंदफळ येथे विवाह प्रसंगी आपली हजेरी लावणार आहेत. शुक्रवारी महायुतीतील मित्र पक्षात पडलेला मिठाचा खडा, या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Jan Awaz | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail