सत्ता,संपत्ती आणि समान संधीसाठी महिलांनी संघटित होण्याची गरज – मारुती बनसोडे
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ):
आजच्या काळात कायद्याने स्त्रीयांना अनेक अधिकार दिले आहे पण त्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागगृती होण्याची व सत्ता, संपत्ती आणि समान संधी साठी महिलांनी संघटित होण्याची गरज आहे असे मत परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे सचिव मारुती बनसोडे यांनी मांडले आहे
पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग , साऊ फाउंडेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली यावेळी मी महिलांना महिला सक्षमीकरणाबाबत अनेक विषयाची माहिती दिली बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ,सामाजिक सक्षमीकरण व राजकीय सक्षमीकरण सुद्धा होते याची उदाहरणे त्यांना दिलेली आहेत. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता ही कार्यशाळा ज्योती पवार यांनी पुढाकार घेऊन आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी विजय काका जाधव उमरगा, काशिनाथ पाटील लोहारा, पल्लवी पाटील महिला बाल कल्याण विभागाच्या निरीक्षक धाराशिव , मीना सोमाणी तुळजापूर, नळदुर्ग परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ अपर्णा बेडगे, छीमाबाई राठोड ,सतीश चव्हाण ,गणेश नावडे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नावडे यांनी केले प्रास्ताविक सतीश चव्हाण यांनी केले आणि ज्योती पवार यांनी संस्थेची भूमिका मांडली. विजय काका जाधव यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली.






