Best News Portal Development Company In India

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई: गाझी स्कूलजवळ छापा मारून पावणे १८ लाखांचा अवैध गुटखा व वाहने जप्त; एक आरोपी रंगेहाथ अटक!

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई: गाझी स्कूलजवळ छापा मारून पावणे १८ लाखांचा अवैध गुटखा व वाहने जप्त; एक आरोपी रंगेहाथ अटक!
​तुळजापूर प्रतिनिधी :- शहर परिसरातील गाझी स्कूलजवळ छापा मारून धाराशिव पोलिसांनी अवैध गुटख्याची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹१७,८२,२९७/- किंमतीचा बंदी असलेला गुटखा, पानमसाला आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली असून एका आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
​नेमकी घटना काय?
​दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास परीक्षावधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, धाराशिव शहरातील शम्स चौक परिसरातील गाझी स्कूलजवळ एका टोयोटा इनोव्हा गाडीमधून अवैध गुटखा आणून तो दुसऱ्या वाहनात शिफ्ट केला जात आहे.
​मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपी सलमान गुलाम शेख (रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) हा इनोव्हा गाडीतून (MH 24 V 1642) गुटख्याच्या गोणी काढून महिंद्रा पिकअप (MH 12 SF 4070) मध्ये भरताना पोलिसांना रंगेहाथ सापडला.
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
​पोलीस पथकाने आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि वाहने असा एकूण ₹१७,८२,२९७/- चा ऐवज हस्तगत केला:
​प्रतिबंधित गुटखा व पानमसाला: बादशहा, गोवा (लाल व हिरवा), डायरेक्टर स्पेशल, विमल, विमल (६ पाऊच), V1 तंबाखू, राज निवास (लाल व निळा), प्रिमियम KNO ZAFRAVI ZARDA, प्रिमियम शॉट लक्झरी, सिल्व्हर तंबाखू आणि रत्ना छाप तंबाखू — एकूण किंमत ₹६,८२,२९७/-
​वाहने: 1. महिंद्रा पिकअप (MH 12 SF 4070) — किंमत ₹६,००,०००/-
2. टोयोटा इनोव्हा (MH 24 V 1642) — किंमत ₹५,००,०००/-
​कायदेशीर कारवाई
​या प्रकरणी आरोपी सलमान गुलाम शेख याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन कायदा (FDA Rules) आणि अन्न सुरक्षेच्या संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​तपास पथक
​ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम आणि मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली:
​परीक्षावधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते
​पोलीस निरीक्षक कुमार दराडे
​पोउपनि अक्षय डिघोळे
​सपोफौ/३०० कऱ्हाळे
​पोअं/१४५ जाधवर
​चालक पोहेकॉ/४५६ रणनवरे
​पोअं/१०४८ नाईकवाडी

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india